भारत

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी खरेदी केली करोडोंची आलिशान कार, किंमत पाहून तुमचेही फिरतील डोळे

Mukesh Ambani : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा एक आलिशान कार खरेदी केली आहे. तसेच त्यांच्याकडे आगोदरच अनेक आलिशान कार आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या कार कलेक्शन आहे.

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे इतका पैसे आहे तरीही ते कोणत्याही कार्यक्रमात सामान्यपणाने सहभागी होत असतात.

मुकेश अंबानी यांना महागड्या कार कलेक्शन करणे खूप आवडते. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. त्यांनी मुंबईतील त्यांच्या घरामध्ये कार पार्किंग बनवले आहे त्यामध्ये अनेक महागड्या कार उपलब्ध हेत.

मुकेश अंबानी यांनी ही आलिशान कार खरेदी केली आहे

मुकेश अंबानी यांनी Aston Martin DB11 आणखी एक महागडी कार खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताफ्यामध्ये ही कार दिसून आली आहे. या कारची किंमत करोडोंच्या घरात आहे.

कारची किंमत 5 कोटी रुपये

ही लक्झरी कार इंग्लंडच्या Aston Martin Lagonda Global Holdings PLC कंपनीने बनवली आहे. हायस्पीड स्पोर्ट्स कार बनवण्यासाठी ती जगप्रसिद्ध आहे. मुकेश अंबानींनी जे अ‍ॅस्टन मार्टिन मॉडेल विकत घेतले आहे, त्याची भारतातील ऑन रोड किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.

या कारमध्ये अप्रतिम फीचर्स आहेत. ही कार 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन कारला 503 अश्वशक्ती देते आणि 695 Nm टॉर्क निर्माण करते. कार फक्त 3.9 सेकंदात 0-100 mph पर्यंत वेग घेऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 321 किलोमीटर प्रति तास आहे.

ही कार उच्च दर्जाची ध्वनी प्रणाली, हवामान नियंत्रण अशा अनेक नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. सीट अतिशय आरामदायक आहेत आणि डॅशबोर्ड डॅशिंग आहे. क्वांटम सिल्व्हरच्या खास शेडमध्ये ते रंगवण्यात आले आहे. दिसायला ही कार खूपच मस्त दिसते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts