मुकेश अंबानी पडले मागे ; चीनचा ‘हा’ व्यक्ती बनला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- मुकेश अंबानी यांना मागे टाकत चीनचे वॉटर किंग म्हणून ओळखल्या जाणारे उद्योगपती झोंग शानशान हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

यावर्षी त्यांची संपत्ती ७०.९ अब्ज डॉलर्सने वाढून ७७.८ अब्ज डॉलर झाली आहे. झोंग शानशान हे केवळ आशियातील सर्वात श्रीमंत माणूस नाही तर संपत्तीच्या बाबतीत त्यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती , अलिबाबाचे जॅक मा यांना देखील मागे टाकले आहे.

शानशान मिनरल वॉटर आणि कोरोनाची लस बनविणारे चीनचे उद्योजक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सचा अहवाल सप्टेंबरमध्ये आला होता. झोंग शानशान हे ज्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर होते.

त्यांना तेव्हा आशियातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानीनंतर दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हटले गेले होते. त्यानंतर असा अंदाज व्यक्त केला जात होता की ज्या वेगाने त्यांची संपत्ती वाढत होती, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ते जबरदस्त टक्कर देऊ शकतात.

आता हीच गोष्ट घडली आहे. कारण त्यासंबंधी एक नवा डेटा समोर आला आहे. पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग्य क्षेत्रात झोंग (६६) यांचा व्यवसाय आहे. नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलरवर यावर्षी झोंगची संपत्ती गेली आहे आणि त्यासह ते जगातील ११व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या नवीन अहवालानुसार, संपत्तीतील जलद वाढ होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. ते देखील अशा वेळी जेव्हा त्यांना चीनच्या बाहेर फारसे कुणी ओळखत नव्हते. त्यांना दोन कारणांमुळे यश मिळाले. एप्रिलमध्ये,

त्यांनी बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझ कंपनीकडून लस विकसित केली आणि काही महिन्यांनंतर नोंगफू स्प्रिंग कंपनीने बाटलीबंद पाणी बनविले, जे हाँगकाँगमध्ये सर्वात लोकप्रिय झाले. नोंगफूच्या शेअर्सने सुरूवातीपासूनच १५५ टक्क्यांनी व व्हेंटईने २ हजार टक्क्यांहून अधिक उडी घेतली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24