Categories: भारत

‘निसर्ग’ चक्रीवादळ येतंय! ‘अशी’ घ्या काळजी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : आधीच कोरोनाने हैराण झालेल्या महाराष्ट्रासमोर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.  परंतु या काळात आपणही सजग असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत .

-विजेच्या उपकरणांचा वापर करणं टाळा.

-महत्त्वाची कागदपत्र, दागिने वगैरे वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.

-विद्युत उपकरणांची तपासणी करुन ठेवा.

-मोबाईल, पॉवरबँक, बॅटरीवर चालणाऱ्या विजेऱ्या चार्ज करुन ठेवा.

-माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या अधिकृत वृत्तांवर लक्ष ठेवा.

-दूरदर्शन, आकाशवाणीवरुन हवामान खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या निर्देशांचं पालन करा.

-पिण्याचं स्वच्छ पाणी साठवून ठेवा.

-घराच्या काही खिडक्या बंद ठेवा, तर काही उघड्या ठेवा.

-मोठं छत असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळा. सोबतच डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा वापर करा.

-घराबाहेर जाणं टाळा

-जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जाणं टाळा

-तुम्ही राहत असणारं घर काही कारणास्तव धोक्यात असल्याची शंका येताच तिथून वेळ हाती असतानाच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हा.

-अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका.

-गॅस पाईपलाईन, सिलेंडर तपासून पाहा.

आपात्कालीन किट सोबत बाळगा
निसग्र चक्रीवादळाची एकंदर तीव्रता आणि त्या धर्तीवर देण्यात आलेली धोक्याची सूचना पाहता नागरिकांना सातत्यानं सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

शिवाय संकटाच्या वेळी काही गोष्टी सोबतच असाव्यात या कारणास्तव आपात्कालीन किटसुद्धा बाळगण्यासा सल्ला देण्यात आला आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24