Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सतत त्याच्या अभिनयावरून चर्चेत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक अडचणींचा सामना करत नवाजुद्दीन सिद्दीकी आज या ठिकाणी पोहोचला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने आजपर्यंत एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. लोकांचा देखील अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जीवनशैलीबद्दल फार काही माहिती नसेल. मात्र त्याची जीवनशैलीबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
https://www.instagram.com/reel/CrsdoL5opnv/?utm_source=ig_web_copy_link
चला नवाजुद्दीन सिद्दीकीची लक्झरी जीवनशैली आणि एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया.
नवाजुद्दीन सिद्दीकी नेट वर्थ
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या संपत्तीचा आकडा करोडोंमध्ये आहे. त्याची एकूण संपत्ती $13 दशलक्ष आहे म्हणजेच ती भारतीय रुपयांमध्ये एकूण सुमारे 96 कोटी रुपये आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीचे आलिशान घर
नवाजुद्दीन सिद्दिकीचे मुंबईमध्ये एक आलिशान घर आहे. मुंबईतील वर्सोवा येथे २०१७ मध्ये त्याने एक घर विकत घेतले आहे. त्या आलिशान घराची अंदाजे किंमत 12.80 कोटी रुपये आहे. त्याने या घराचे नाव वडिलांच्या नावावरून ठेवले आहे. त्याच्या मुंबईतील वर्सोवा येथील घराचे नाव नवाब असे आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीचे लक्झरी कार कलेक्शन
Mercedes Benz
नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्याकडे अनेक कार आहेत. त्याला महागड्या कारचे कलेक्शन करण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडील Mercedes Benz या महागड्या कारची किंमत सुमारे 42 लाख रुपये आहे.
BMW
नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्याकडे असलेल्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये BMW कारचा देखील समावेश आहे. त्याच्याकडील BMW कारची किंमत 43.50 लाख रुपये आहे.
Ford Endeavour
नवाजुद्दीन सिद्दिकीकडे Ford Endeavour ही एक लक्झरी कार आहे. या कारची किंमत 36.25 लाख रुपये आहे.
Mercedes GLS
तसेच Mercedes GLS ही एक एक लक्झरी कार नवाजुद्दीन सिद्दिकीकडे आहे. या कारची किंमत 1.29 करोड़ रुपये आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की त्याच्याकडे किती लक्झरी कार आहेत.