Categories: भारत

नेहा कक्कर लग्ना आधीच प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली गोड बातमी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसापासून नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत. सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे.

नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

नेहाच्या या फोटोवर अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नेहाने अलिकडेच तिचा आणि रोहनप्रीतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे.

नेहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती अशी चर्चा रंगली आहे.

नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे नेहाच्या या प्रेग्नसीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24