नवी दिल्ली : घरगुती वापरासाठीच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ७७ रुपये वाढ झाली आहे. यामुळे विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजारभाव आता ७१६.५० रुपये झाला आहे.
दरवाढीच्या आधी विनाअनुदानित सिलिंडर ६३९.५० रुपयांना उपलब्ध होता, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही ११९ रुपयांतही वाढ झाली आहे. दुकानदारांना व्यावसायिक सिलिंडर १२८८ रुपयांना मिळणार आहे.
दरवाढी आधी हा सिलिंडर दुकानदारांना ११६९ रुपयांत उपलब्ध होता, तर ५ किलोच्या छोटा सिलिंडरचा दरही २६४.५० रुपयांपर्यंत वाढला आहे.