इस्लामाबाद :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवाई हद्दीतून विमान नेऊ देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली आहे.
मोदींच्या आगामी सौदी अरेबिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेजारी राष्ट्राकडे ही परवानगी मागण्यात आली होती.
पंतप्रधान मोदींच्या हवाई मार्गे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सरकारचा हा निर्णय जाहीर केला. अशा प्रकारची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या विरोधात पाक सरकारने काळा दिन जाहीर केला. काश्मीरमधील जनतेला पाठिंबा दर्शवण्याचे पाकने ठरवले आहे.