भुवनेश्वर ;- नवीन मोटर वाहन कायद्यात बदल झाल्यानंतर दारु पिऊन रिक्षा चालवणे चालकास चांगलेच महागात पडले. भुवनेश्वरात पोलिसांनी रिक्षा चालकावर या नियमाचा भंग केल्याने ४७ हजार ५०० रुपये दंड लावला.
याच प्रकारे हरियाणातील गुडगावात रिक्षा चालकावर ३२ हजार रुपये दंड लावला आहे. तर ट्रॅक्टर चालकावर ५९ हजाराचा दंड लावण्यात आला. पोलिसांनी त्याला सामान्य नियम तोडल्याबद्दल ५०० रुपये, अनधिकृत व्यक्तीने वाहन चालवल्याबद्दल ५ हजार,
विना परवाना चालवल्याबद्दल ५ हजार, दारु पिऊन वाहन चालवल्याबद्दल १० हजार, प्रदूषणाचे उल्लंघन केल्याबद्दल १० हजार, विना परमिट गाडी चालवल्याबद्दल १० हजार, नोंदणी व फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने ५ हजार दंड लावला.