Toll Collection System : देशभरातील नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे, तुम्ही हायवेवर कारने प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक वेळा टोल भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले असेल.
मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, सरकार राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहनांसाठी टोल वसुलीऐवजी मासिक आणि वार्षिक पास सिस्टिम लागू करण्यावर विचार करत आहे.
गडकरी यांच्या या नवीन यंत्रणेच्या घोषणेनंतर हायवेवरील टोल वसुली प्रणाली अधिक सोयीस्कर होईल. खाजगी वाहनधारकांसाठी मासिक आणि वार्षिक पास सिस्टिमचा वापर करण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे, प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल आणि टोल वसुली प्रक्रियेतही पारदर्शकता येईल.
खासगी वाहनांचा वाटा कमी
गडकरी यांनी सांगितले की, सध्या एकूण टोल वसुलीमध्ये खाजगी वाहनांचा वाटा फक्त 26 टक्के आहे. त्यामुळे या नवीन पास प्रणालीला राबविताना सरकारला कोणतही नुकसान होणार नाही. खाजगी वाहनांसाठी मासिक आणि वार्षिक पास सुरू केल्यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची अडचण नाहीशी होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
व्यावसायिक वाहने आणि टोल महसूल
गडकरी यांच्या मते, 74 टक्के टोल महसूल व्यावसायिक वाहनांमधून येतो. यामुळे, सरकारला ही नवीन यंत्रणा लागू करताना तितकीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण सर्वाधिक महसूल व्यावसायिक वाहनांमधून मिळत आहे.
नवीन टोल प्रणालीचे फायदे
नवीन मासिक आणि वार्षिक पास सिस्टिम लागू केल्यास, सामान्य कार चालकांना दररोज टोल भरून वेळ घालवावा लागणार नाही, तसेच त्यांना रांगेत उभे राहून अनावश्यक वेळ वाया घालवावा लागणार नाही. यातून एकाच टोल प्लाझावर अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.
गावांतील टोल वसुली बूथची योजना
याशिवाय, गडकरी यांनी सांगितले की, गावांच्या बाहेर टोल वसुली बूथ बांधले जातील, जेणेकरून स्थानिक नागरिकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये. यामुळे, गावा-गावात जाणारे वाहन चालक थांबायला लागणार नाहीत आणि रांगेत उभे राहून वेळ वाया घालवावा लागणार नाही.