अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-परमेश्वराने श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत अशा सर्वांनाच वेदनेपासून दिलासा मिळावा, त्यांचा आजार बरा व्हावा, नवीन आजार होऊ नये, यासाठी या सर्वांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य निर्माण केले.
पुढे अनेक पॅथी आल्या आणि ऍलोपॅथीने या क्षेत्रात जम बसविला. यातून निर्माण झालेले डॉक्टर सामान्यांची सेवा करायला लागले. मात्र या क्षेत्रात डॉक्टरांप्रमाणेच काही हावरट वृत्तीचे डॉक्टर्स आले आणि हे क्षेत्र बदनाम झाले.
दुर्दैवाने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही स्वार्थी आणि पैशांसाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची तयारी असलेल्या डॉक्टरांमुळे हे क्षेत्र कलंकित झाले. राजधानी नवीदिल्लीमध्ये डॉक्टरचा ऍप्रन घालून सामान्यांचे मुडदे पाडणाऱ्या एका क्रूरकर्माचा भयानक चेहरा समोर आलाय. डॉक्टरांच्या क्षेत्राला कलंक ठरलेल्या या हैवान नराधमाचं नाव आहे देवेंद्र शर्मा.
सिरियल किलर देवेंद्र शर्माने यापूर्वी ५० लोकांच्या हत्येनंतर खूनांची संख्या मोजणं सोडलं होतं. पण आता त्याने पोलिसांना धक्कादायक कबूली दिली आहे. आतापर्यंत देवेंद्र शर्मा याने १०० हून अधिक लोकांचा बळी घेतलाय. यातील अनेकांचा मृतदेह त्याने उत्तर प्रदेशातील प्रदेशातील मगरीला खाण्यासाठी एका कालव्यात टाकला आहे.
गुंतवणूकीमध्ये एकदा फसवणूक झाल्यानंतर त्याने खूनाचा हा मार्ग निवडल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर त्याने अनेक डॉक्टरांसह किडनी प्रत्यारोपण रॅकेटही सुरू केलं. एवढेच नाही तर त्याने चोरी केलेली वाहनेही विकली. त्याची एक बनावट गॅस कंपनी असल्याचंही सांगण्यात येत आहे.
देवेंद्र त्याच्या गाडीसाठी कॅब चालकांना ठार मारायचा. दिल्लीहून यूपीला जाण्यासाठी ज्यांनी टॅक्सी बुक केली त्यांना लुटायचा आणि ठार मारायचा.
एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची लूट करणाऱ्या शर्मा याने एक टोळी तयार केली. यासाठी तो ड्रायव्हरला ठार मारायचा आणि ट्रक चोरायचा. त्याने टोळीसह तब्बल २४ खून केले असल्याची कबूली दिलीय. आतापर्यंत त्याने तब्बल सात लाखांच्या दराने १२५ किडनी प्रत्यारोपण केले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com