आता पोस्टमन करणार तुमच्या घराचा सर्वे…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली असून, या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पोस्ट खात्याचे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक करणार आहेत. पीएम सूर्यघर ॲपवर याची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असून, सौर ऊर्जेचे संयंत्र बसवण्यासाठी अनुदान देखील दिले जाणार आहे.

सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांनी सहयोग द्यावा, असे आवाहन सहाय्यक डाक अधीक्षक संदीप हदगल यांनी केले आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.

या योजनेच्या माहितीचा जनजागर करीत सर्वेक्षणाची जबाबदारी भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट खात्यावर सोपविण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी पीएम सूर्यघर ॲप विकसित करण्यात आले आहे.

याच ॲपवर घरोघरी जाऊन पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन सर्वेक्षण करणार आहेत. देशभरात एक कोटी घरात पीएम सूर्यघर योजना पोहोचवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. घराच्या छतावर सौर उर्जा वीजनिर्मिती संच बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे.

निर्माण होणारी सौर उर्जेची वीज वापरून विजेची गरज पूर्ण करायची, असा या योजनेचे मुख्य हेतू आहे आहे. घरावरील संयंत्रातून वीज उपलब्ध झाल्याने विजेचा खर्च वाचणार असून अतिरिक्त निर्माण होणारी वीज महावितरणला विकत देता येणार आहे.

कुटुंबाला तीन किलोवॅट क्षमतेचे सौर यंत्रासाठी काही अनुदान सूर्यघर योजनेतून लाभार्थी कुटुंबाला दिले जाणार आहे. सर्वेक्षणात कुटुंबाच्या वीज वापरासह इतर माहिती संकलित केली जाणार आहे.