Categories: भारत

सुटेबल बॉय’मधील किसींग सीनवर आक्षेप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. पण आता या सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘अ सुटेबल बॉय’ या सीरिजमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

लता मेहेरा आणि कबीर दुर्रानी ही दोन पात्रे मंदिराच्या परिसरात एकमेकांना चुंबन करताना सीरिजमधील एका भागात दाखवण्यात आले आहे. या दृश्यांवर भाजपचे गौरव तिवारी यांनी आक्षेप घेतला आहे.

तसेच तक्रार दाखल केली आहे. गौरव यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘नेटफ्लिक्सवरील अ सुटेबल बॉय या वेब सीरिजमधील एकाच भागात तीन वेळा मंदिराच्या परिसरात चुंबन दृश्य दाखवण्यात आले आहे.

सीरिजच्या कथेनुसार हिंदू मुलगी मुस्लीम मुलावर प्रेम करत असते, पण सगळी चुंबनदृश्ये ही मंदिराच्या परिसरात का चित्रीत करण्यात आली?’ असे गौरव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी या विरोधात एफआयआर दाखल केला असल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24