Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांचे येणार अच्छे दिन! लागू होणार जुनी पेन्शन योजना, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच आता ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु नाही अशा राज्यांमधील सरकारी कर्मचारी ही पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरकारकडून सुरु केली जाण्याची आशा आहे.

देशातील राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे इतर राज्यातील कर्मचारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक होत आहेत.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी दीर्घ संपावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या (ओपीएस बेनिफिट्स) समान लाभांची घोषणा केली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर होते.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर त्यांना सामाजिक सुरक्षा आणि व्यवस्थित जगण्यासाठी संसाधने मिळावीत. त्याआधारे आम्ही एक समिती स्थापन केली आहे जी जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना तपासून अहवाल देईल.

महाराष्ट्रसह, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटक राज्यामध्ये मे-जूनमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर जुनी पेन्शन योजना सुरु केली जाऊ शकते.

तर मध्य प्रदेश राज्यामध्ये काँग्रेसने आधीच सांगितले आहे की, राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाले तर ते जुनी पेन्शन योजना लागू करेल. शिवराज सरकारने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केले आहे की, सध्या त्यांचा OPS लागू करण्याचा कोणताही विचार नाही.

OPS आणि NPS मध्ये काय फरक आहे

1 एप्रिल 2004 रोजी तत्कालीन अल्ट बिहारी वाजपेयी सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर जुन्या पेन्शन योजनेच्या जागी 2004 मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम सुरू करण्यात आली.

जुनी पेन्शन प्रणाली (OPS) अंतर्गत, केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन देत असे. सदर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या वेतनश्रेणीवर ते आधारित होते. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनाही पेन्शनचा लाभ देण्यात आला. परंतु नवीन पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापली जाते.

तर नवीन पेन्शन योजनेत (NPS) ही व्यवस्था नाही. पेन्शन म्हणून किती रक्कम मिळेल याची शाश्वती नाही. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे, तर जुन्या पेन्शन योजनेत असे काहीही नव्हते.