श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना रविवारी पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यात अलिप्ततावाद्यांचे समर्थन केल्याबद्दल लोक सुरक्षा कायद्यानुसार (पीएसए) त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
देशविरोधी वक्तव्ये करणे तथा प्रतिबंधित ‘जमात-ए-इस्लामी’च्या कारवायांना समर्थन दिल्याचा आरोप पीडीपीच्या ६० वर्षीय नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आहे. त्यांच्या भूमिकेमुळे काश्मीर खोऱ्यातील स्थिती बिघडू नये म्हणून त्यांना पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
विशेष बाब अशी की, अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमानुसार, (यूएपीए) ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही या संघटनेला पाठिंबा देण्याचा पवित्रा मुफ्ती यांनी घेतला आहे.
दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.