अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.
मात्र या प्रकरणापासून चार हात दूर असलेल्या आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने प्रथमच भूमिका मांडली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत विरोधकांना टोला हाणला आहे.
सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं होत यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती.नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केलं. सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असं थोरात यांना विचारण्यात आलं.
त्यावर, ‘या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये,’ एवढंच ते म्हणाले. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही.
आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या प्रकरणापासून चार हात दूर असलेल्या आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने प्रथमच भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत विरोधकांना टोला हाणला आहे.सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं होतं. यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे.काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती. नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केलं.
सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असं थोरात यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये,’ एवढंच ते म्हणाले. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही.
हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल.पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved