अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-आपल्या पोलीस मैत्रिणीचा पोशाख घालून टिक टॉकवर व्हिडीओ बनवणं चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिरा रोड पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सरकारी पोशाख त्यांच्या मैत्रिणीने परिधान करून गाणे गात टिक टॉकवर व्हिडीओ टाकून सोशल मीडियावर पसरवल्याची बाब समोर आली.
पोलिस अधीक्षकांनी त्याची गंभीर दाखल घेत त्याच्या चौकशीचे आदेश मिरा रोड पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिरा रोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com