Oneplus TV Y1S 40 inch : आजकाल दिवसेंदिवस बाजारात अनेक स्मार्टटीव्ही लॉन्च होत आहेत. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे. तुम्हाला एका पेक्षा एक मोठे टीव्ही बाजारात पाहायला मिळतील. आता Oneplus चा आणखी एक स्मार्टटीव्ही भारतात लॉन्च होणार आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीकडून OnePlus TV Y1s टीव्ही लॉन्च केला आहे. हा टीव्ही 32-इंच आणि 43-इंचासह बाजारात लॉन्च करण्यात आला होता. आता कंपनी 40 इंच आकारमानासह सादर करण्याच्या तयारीत आहे.
पण कंपनीकडून या स्मार्टटीही बाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच कंपनीकडून 40-इंचाचा टीव्ही सादर केला जाऊ शकतो. या टीव्हीमध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये
OnePlus Y1S 32-इंच टीव्हीची किंमत भारतात 14,499 रुपये आहे. तर कंपनीच्या 43-इंचाच्या व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. आता कंपनीकडून 40-इंच आकाराचा टीव्ही लॉन्च केला जाणार आहे. 20,000 रुपयांच्या किंमतीसह कंपनीकडून हा स्मार्टटीव्ही सादर केला जाऊ शकतो.
हा 40-इंच आकाराच्या टीव्हीमध्ये 43-इंच मॉडेल्सच्या समान वैशिष्ट्यांसह सादर केला जाऊ शकतो. नवीन 40-इंच मॉडेल HD रिझोल्यूशनसह येण्याची अपेक्षा करू शकतो. तसेच यामध्ये कनेक्टिव्हिटीचे अनेक पर्याय दिले जाऊ शकतात.
OnePlus TV Y1S 32 इंच आणि 43 इंच मॉडेल्सचे तपशील
OnePlus TV Y1S 32-इंच मॉडेल HD रिझोल्यूशन देते, तर 43-इंच मॉडेल फुल HD रिझोल्यूशनसह येते. या दोन्ही टीव्ही प्रकारांमध्ये अधिक चांगल्या रंगासाठी आणि HLG, HDR 10, HDR 10+ फॉरमॅटसाठी गामा इंजिन आहे.
चांगला ऑडिओ अनुभव देण्यासाठी, यात 24W स्पीकर मिळतात, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. टीव्ही MEDIATEK MT9216 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, जो Mali G32 MP2 GPU सह जोडलेला आहे.
दोन्ही टीव्ही 1GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह येतात. सॉफ्टवेअरसाठी, OnePlus TV Y1s Android TV 11 OS वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी, दोन्ही TV मध्ये Wi-Fi 802.11 b/g/n/ac, Bluetooth v5.0, RJ45 पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट आणि AV इनपुट सारखे पर्याय दिले गेले आहेत.