अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-मोदी सरकारने मंगळवारी Toycathon 2021 लॉन्च केले. याअंतर्गत स्पर्धकांना नवीन खेळणी व गेमसाठी एक विशेष कन्सेप्ट तयार करून पाठवायची आहे जी भारतीय संस्कृती, इतिहास, पौराणिक कथा इत्यादीवर आधारित असेल.
यात 50 लाखांपर्यंत बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यात विद्यार्थी, शिक्षक, स्टार्ट अप्स आणि खेळण्यांसंदर्भामधील तज्ञ आणि व्यावसायिक यात सहभागी होऊ शकतात.
या विजेत्यांना राष्ट्रीय टॉय फेअरमध्ये आपली संकल्पना दर्शविण्याची संधी देखील मिळणार आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही समाविष्ट असतील.
या व्यतिरिक्त, उत्तम टॉय संकल्पनांचा व्यवसासायांत समावेश करण्यासाठी उद्योग आणि गुंतवणूकदारांकडून पाठिंबा घेतला जाईल.
टॉयकाथॉनसाठी रजिस्ट्रेशन सुरू :- मंगळवारपासून टॉयकाथॉनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. 20 जानेवारीपर्यंत हा प्रस्ताव ऑनलाईन सादर करता येईल. 21 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे मूल्यांकन केले जाईल. यात शॉर्टलिस्टेड केलेल्या आयडियांची घोषणा 12 फेब्रुवारी रोजी होईल. 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत भव्य समाप्ती होईल.
ग्रँड फिनाले आपल्या जवळच्या नोडल सेंटर किंवा एटीएल वर असेल. येथे आपल्याला आपल्या टीम आणि मार्गदर्शकासह यावे लागेल. अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग मुलांसाठी खेळणी तयार करणे तसेच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे तसेच वैदिक गणिताला प्रोत्साहन देणे हे देखील उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेचा फोकस राष्ट्रीय एकता वाढविणे आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर करणे यावर आहे. यासह स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ या मोहिमेस पाठिंबा देणे हे देखील उद्दिष्ट आहे. याशिवाय पारंपारिक भारतीय खेळणी पुन्हा शोधून डिझाइन करणे हे देखील आहे.
मंगळवारी या लॉन्चवेळी शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, टॉयकाथॉन हे जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आयोजित केले जात आहे. ते म्हणाले की भारतातील खेळण्यांचे बाजार हे आर्थिकआधारावर सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु दुर्दैवाने यातील 80 टक्के खेळणी भारतात आयात केली जातात.