भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे व भारतामध्ये परंपरा आणि राहणीमान तसेच बोलीभाषा इत्यादी प्रत्येक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. तसेच भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश असून भारतामध्ये अनेक स्थळे आणि गावे यांची एक विविधता आणि विशेषता आपल्याला दिसून येते.
मग ती विशेषता कोणत्याही गोष्टींच्या स्वरूपाने असू शकते आणि त्यामुळे हे ठिकाणे किंवा गावे इतर गावांपेक्षा किंवा ठिकाणांपेक्षा वेगळी राहतात किंवा वेगळी असतात. आता भारतातील गावांच्या बाबतीत पाहिले तर हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भारतातील एका गावाची माहिती घ्यावी लागेल
व त्या गावाची विशेषता अशी आहे की ते संपूर्ण जगातील पहिले असे गाव आहे की त्याला पहिले शाकाहारी शहर असे म्हटले जाते.या गावांमध्ये मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे व त्यामुळे हे शहर आता जगातील पहिले शाकाहारी शहर म्हणून ओळखले जाते.
गुजरात राज्यातील पालीताना हे शहर आहे जगातील पहिले शाकाहारी शहर
पालीताना हे शहर गुजरात राज्यामध्ये असून गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यापासून साधारणपणे 55 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. पालीताना या शहराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या शहराला आता जगातील पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे व आता हे जगातील पहिले शाकाहारी शहर म्हणून ओळखले जाणार आहे.
पालीताना मध्ये मांसाहार करण्यावर आणि मांस खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे व त्यामुळे मांसाहार बंदी असलेले हे पहिले शहर देखील ठरले आहे. मांसाहारच नाही तर या शहरामध्ये अंडी विक्री देखील करण्यावर बंदी आहे.
पालीताना शहराची काय आहे विशेषता?
भावनगर जिल्ह्यात असलेले हे अगदी छोटेसे शहर आहे. परंतु हे जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या शहरात अन्नाकरिता प्राण्यांच्या हत्या करणे बेकायदा मानले जाते व त्यामुळेच या ठिकाणी अंडी आणि मांस विक्रीवर बंदी आहे.
हे जैन धर्मियांचे एक पवित्र ठिकाण असल्यामुळे जैन धर्मांचे अनुयायी या ठिकाणी दर्शनाला येत असतात व एवढेच नाही तर या ठिकाणी काही दिवस राहतात देखील. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीचे दुकाने बंद करत प्राण्यांचे हत्या थांबवण्याची मागणी जैन अनुयायांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेली होती व याकरिता 200 पेक्षा जास्त जैन भिक्कूनी रस्त्यावर आंदोलन देखील केले होते.
या गावांमध्ये शेकडो मंदिरे आहेत. तसेच जगातील सर्वात मोठे मंदिर संकुल असल्याने या शहराला जैन मंदिर शहर या टोपणनावाने देखील ओळखतात. शत्रुंजय डोंगराभोवती वसलेल्या या शहरांमध्ये 800 पेक्षा अधिक मंदिरे असून मंदिरापर्यंतच पोहोचण्यासाठी तीन हजार 950 पायऱ्या चढून जावे लागते.
यामध्ये आदिनाथ मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे व त्यातील सर्व मंदिरे पाहण्याकरिता आणि दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी येतात. या सगळ्या गोष्टींमुळे पालीताना शहराला अध्यात्मिक महत्त्व आहे.