नव्या कोरोनाची दहशत ! सौदीत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण सौदी अरेबियाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला असून आणखी आठवडयाभरासाठी ही स्थगिती वाढवली जाऊ शकते. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना देशात येण्यास प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

करोनाचा हा नवीन प्रकार वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचे ब्रिटनच्या तज्ज्ञांचे मत आहे. भारतानंही 31 डिसेंबर 2020 पर्यंत युकेला जाणारी आणि येणारी सर्व विमानं रद्द केली आहेत.

22 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तोपर्यंत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचाणी केली जाणार आहे. दरम्यान सौदीमध्ये मागच्या आठवडयात फायझरची कोरोना लस पोहोचली.

तिथे लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख 61 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विषाणूच्या फैलावाला एक वर्ष होऊन गेलं आहे. कोरोनावर लस शोधली असली तरी कोरोनाचा नवा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळं येणारी लस आली किती परिणामकारक असणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सातत्यानं हात धुळे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24