Passenger Rights In Train : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन रेल्वेला ओळखले जाते. दररोज रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. पण त्यांना रेल्वेचे अनेक नियम माहिती नसतात.
भारतात दररोज 13,000 हून अधिक रेल्वे धावत असतात. या रेल्वेमधून 24 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे विभागाचे नियम माहिती असणे आवश्यक आहे. या नियमांचा तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना उपयोग होऊ शकतो.
रेल्वेच्या कोणत्याही श्रेणीतील डब्यातून प्रवास करताना तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्हाला रेल्वेकडून ५ महत्वाचे अधिकार मिळतात. त्याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत…
वैद्यकीय मदत
रेल्वेने प्रवास करत असताना अनेकांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे रेल्वेमध्ये तुम्हाला तात्काळ मदत दिली जाते. टीटीई आणि अधीक्षक प्रवाशांना शक्य ती सर्व मदत करतील. ही सुविधा तुम्हाला मोफत दिली जाईल.
तत्काळ तिकिटावर परतावा
तत्काळ तिकिटावर परतावा मिळत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. यावरही रेल्वे रिफंड देते. पण काही अटी आहेत. उदाहरणार्थ, जर ट्रेनच्या मार्गात बदल झाला असेल किंवा ट्रेनला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल तर परतावा दिला जाईल.
…तर दुसऱ्या कोणाला तरी जागा मिळेल
तुम्ही अनेकदा रेल्वेचे बुकिंग करता आणि तुम्हाला जी सीट मिळाली आहे तिथे न थांबता दुसऱ्या डब्यात जाता. जर तुम्ही बुकिंग केल्यांपासूनचा स्टेशनपासून पुढील स्टेशनपर्यंत तुमच्या सीटवर आला नाही तर TTE तुमची जागा दुसऱ्याला देऊ शकते.
रात्रीचा नियम
रेल्वे विभागाकडून दिवसेंदिवस नियमांमध्ये अनेक बदल करत असते. आता रेल्वे विभागाकडून स्त्रीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. रात्री १० नंतर TTE तुम्हाला तपासण्यासाठी विचारू शकत नाही.
…तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील
तुम्हाला कुठेतरी जायचे असेल आणि ट्रेन मध्येच थांबली असेल आणि पुढे जाण्यासाठी रेल्वेने कोणतीही व्यवस्था केलेली नसेल, तर तुम्ही पूर्ण परतावा मागू शकता. रेल्वेने पुढच्या प्रवासाची व्यवस्था केली असेल पण प्रवाशाला तिथे जायचे नसेल, तर पुढच्या प्रवासापर्यंतच्या पैशावर दावा केला जाऊ शकतो. मात्र प्रवाशाला तिकीट सरेंडर करावे लागेल.