भारत

Period Pain Tips : महिलांनो द्या लक्ष! मासिक पाळी दरम्यान पोट आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी खा हे ५ पदार्थ, मिळेल त्वरित आराम

Published by
Ahmednagarlive24 Office

Period Pain Tips : मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना मासिक पाळी दर महिन्याला येत असते. यावेळी त्यांच्या शरीरातील हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत असतो.

या दरम्यान महिलांना मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका हवी असते. मात्र पीरियड्स दरम्यान हार्मोन्समध्ये खूप चढ-उतार होत असतात ज्यामुळे महिलांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो.

त्यामुळे महिलांनी अशावेळी तळलेले पदार्थ जसे की फास्ट फूड किंवा जंक फूड, पॅक्ड फूड किंवा बाजारातील इतर मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यावेळी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे गरजेचे असते.

मासिक पाळी दरम्यान महिलांचे मूड स्विंग, चिडचिड आणि इतर भावनिक असंतुलन होऊ शकते. रक्तस्रावामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. त्यामुळे महिलांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागते.

मासिक पाळीदरम्यान महिलांना असह्य वेदना होत असतात. त्यांच्या अंगामध्ये कमी ऊर्जा असते त्यामुळे त्यांची सतत चिडचिड होत असते. केळी खाल्ल्याने महिलांना मासिक पाळीदरम्यान आराम मिळू शकतो.

मासिक पाळी दरम्यान काय खावे?

बीटचा रस

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक गोष्टी न खाण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. या दरम्यान रक्तस्त्राव होत असल्याने महिलांना अशक्तपणा जाणवतो. यामुळे महिलांमध्ये अॅनिमियाचा धोका जास्त असतो. मासिक पाळीच्या वेळी बीटरूटचा रस पिण्याचे फायदे लोह आणि फॉलिक अॅसिड देतात, जे रक्त तयार करण्यास मदत करतात.

टरबूज आणि काकडी

मासिक पाळीदरम्यान काकडी आणि टरबूज खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे पोटासाठी चांगले असते. जर अशा वेळी पोट फुगण्याची समस्या असल्यास काकडी आणि टरबूज खाणे फायदेशीर असते.

डार्क चॉकलेटचे सेवन करा

महिलांना मासिक पाळीच्या काळात मूड स्विंगची समस्या असते. ज्यासाठी पोषणतज्ञ डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. चॉकलेट हे आनंदी राहण्यास आणि हार्मोन वाढवण्यास मदत करते.

आयुर्वेदिक उपाय

जर तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही लिंबू आणि पुदिन्याचे पाणी करून प्या. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल.

Ahmednagarlive24 Office