अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दरात २५ पैश्यांनी वाढ झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ पैसे तर चेन्नईमध्ये २२ पैश्यांनी वाढ झाली आहे.
एकंदरीत ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागल्याचे दिसत आहे. राज्यातील पेट्रोलच्या दरांविषयी बोलायचं झालं तर परभणीमध्ये सगळ्यात महागडं पेट्रोल मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८६.७० रुपये इतकी आहे तर आज मुंबईत तो भाव ९२.८६ रुपयांवर पोहोचला आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल दर प्रतिलिटर ८७.६९रुपये, चेन्नईमध्ये ८८.८२ रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलची किंमत पाहिली असता, दिल्लीत आज डिझेल ७६.४८ रुपये प्रति लिटरला विकला जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर. ८३.३० आहे.