नवी दिल्ली मे महिन्यानंतर तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत सुधारणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना आणखी खिशाला चाट पडणार आहे.
दरम्यान, सरकारी सुत्रांनी असे संकेत दिले की दररोजच्या किंमतीत सुधारणा केल्यावरही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत निर्धारित प्रमाणपेक्षा अधिक वाढ करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
याचा अर्थ असा होईल की पेट्रोलियम उत्पादनांमध्ये दररोज 30-50 पैशांची वाढ होऊ शकते किंवा तेल कंपन्या खर्च आणि विक्रीतील तफावत दूर करेपर्यंत कमी होऊ शकतात.
OMC च्या सूत्रांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन हटवल्यानंतर ऑटो इंधनच्या दैनंदिन किंमतीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
असे झाल्यास, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात. दररोजच्या किंमतींच्या पुनरीक्षणानुसार किरकोळ किंमतीत झालेली वाढ तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे.
मागील महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची किंमत 50 टक्के जास्त आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाली आहे.