PM Kisan News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, सरकारची मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan News : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हफ्ते देण्यात आले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना 14वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 2 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. आता 14व्या हफ्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.

पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आता तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. या वेळी सरकार केवळ अशाच शेतकऱ्यांना 2000 रुपये देणार आहे, ज्यांची सर्व प्रकारची पडताळणी पूर्ण केली जाईल. म्हणजेच, जर तुम्ही अद्याप तुमची पडताळणी केली नसेल, तर यावेळी तुम्हाला 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे नुकसान होऊ शकते.

हे करणे आवश्यक आहे

केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेबाबत अनेक नवीन नियम जारी केले जात आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून EKYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जर EKYC केलेले नसेल तर शेतकऱ्यांना आता 14वा हफ्ता देण्यात येणार नाही.

सरकारची मोठी घोषणा

सर्व पीएम किसान लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण केली जाईल. पुढील हप्त्याचे पैसे फक्त EKYC केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतील. 8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. या दरम्यान 16,800 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

आता केंद्र सरकारकडून ज्या शेतकऱ्यांना 13व्या हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यांनी EKYC पूर्ण केले आहे अशा शेतकऱ्यांना 4 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे 13 आणि 14वा हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

काय आहे योजना?

केंद्र सरकारचे देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.

हे 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हफ्त्यांमध्ये जमा केले जातात. दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये वर्ग केले जातात. एकूण 3 हफ्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.