PM Kisan Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात खात्यात येणार 2000 हजार रुपये, पहा 14व्या हप्त्याचे ताजे अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Update : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेती क्षेत्राला चालना मिळवी हा योजना सुरु करण्यामागचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून वर्षाला ६ हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. हे पैसे शेतकऱ्यांना ३ हफ्त्यांनी चार चार महिन्यांच्या अंतरावर दिले जातात.

देशातील करोडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ होत आहे. १३व्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच आता लवकरच १४व्या हफ्त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांना पुढील १४वा हफ्ता मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. नियमानुसार, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो.

eKYC करणे बंधनकारक

सरकारकडून पीएम किसान योजनेबद्दल अनेक नियम बदलले जात आहेत. त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांना त्या नियमांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. सरकारकडून पीएम किसान लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजेनचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे जर पीएम किसान योजनेचा १४वा हफ्ता हवा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी करावे लागणार आहे. शेतकरी अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर ई-केवायसी करू शकतात.

पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळेल का?

अनेकांना प्रश्न पडत आहे की पती आणि पत्नी दोघेही अल्पभूधारक शेतकरी असतील तर ते लाभ घेऊ शकतात. तर सरकारच्या नियमानुसार फक्त पती किंवा पत्नी दोघांपैकी एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो. योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो. जर पती आणि पत्नीला लाभ मिळाला असेल तर ते पैसे वसूल केले जातील असे सांगण्यात येत आहे.

याप्रमाणे तपासा लाभार्थी स्थिती

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा, आता ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
आता तुमच्या राज्याचे, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका. त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.
शेतकरी, तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील या यादीत पाहू शकता. येथे तुम्हाला स्टेटसच्या पुढे E-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंग असे लिहिलेला संदेश पाहावा लागेल.
ई-केवायसी, पात्रता आणि जमीन साईडिंग म्हणजेच या तिघांच्या पुढे ‘होय’ असे लिहिले असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
या तिघांच्या पुढे किंवा कोणाच्याही समोर ‘नाही’ लिहिल्यास हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकते.