भारत

पंतप्रधान मोदी म्हणाले…’आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर असल्याचं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजूंचं कौतुक केलं आहे. भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला ट्विटरवर टॅग करत मोदींनी हे उदगार केले आहे. पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात नृत्य करणाऱ्या कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या या व्हिडिओचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं आहे.

रिजिजू यांनी ट्विट केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या गौरवशाली संस्कृतीचं कौतुकही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान अरुणाचल प्रदेशातील काजलंग गावात मिजी जमातीच्या कार्यक्रमात किरेन रिजिजू सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत पारंपरिक नृत्याने करण्यात आले.

त्यावेळी रिजिजू यांनी देखील संगीतावर ताल धरत आपलं नृत्यकौशल्य दाखवून दिलं. या गावातील काही प्रकल्पांना त्यांनी भेट दिल्या.

Ahmednagarlive24 Office