PNB and HDFC Expensive Loan : गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली होती. मात्र आता PNB आणि HDFC बँक ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.
१ मार्चपासून या दोन्ही बँकांच्या सुधारित व्याजदरात वाढ होणार आहे. PNB आणि HDFC बँकांनी कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे जुने कर्जही महाग झाले आहे.
एचडीएफसीने रिटेल प्राइम लेंडिंग रेट 25 बेसिस पॉईंट्सने किमान 9.20 टक्क्यांनी वाढवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कर्जदार, पंजाब नॅशनल बँकने सर्व मुदतीसाठी निधी आधारित कर्ज दर (MCLR) 10 आधार अंकांनी वाढवला आहे.
पीएनबीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ऑटो, वैयक्तिक आणि गृह यासारख्या ग्राहकांच्या कर्जाची किंमत ठरवण्यासाठी वापरला जाणारा बेंचमार्क एक वर्षाचा MCLR, 8.4 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला आहे.
HDFC बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 760 आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअरसह कर्ज आणि वितरण मिळवणाऱ्या ग्राहकांना 8.70 टक्के वार्षिक विशेष ऑफर 31 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
वाहन, गृहकर्ज महागले
ज्या ग्राहकांनी जुने गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेतले आहे अशा लोकांसाठी मोठा झटका मनाला जात आहे. कारण या लोकांच्या करंजावरही अधिक व्याजदराने पैसे आकारले जाणार आहेत.
कर्जावरील सुधारत व्याजदरासह ग्राहकनाकडून पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांच्या EMI मध्येही वाढ होणार आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दर वाढ केल्यानंतर, देशातील सर्वात मोठ्या बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR 10 bps ने वाढविला आहे, ज्यामुळे बहुतेक ग्राहक कर्जे जसे की वाहन किंवा गृहकर्ज कर्जदारांसाठी महाग झाले आहेत. नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनेही आपल्या कर्जदरात ५ बेसिस पॉइंटने वाढ केली आहे.