लॉकडाऊनमध्ये एकीकडे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. नागरिक थोड्या गोष्टींसाठी आपला जीव काढत आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्ये 10 हजारात दारू, खोली आणि कॉलगर्ल उपलब्ध करून दिली जात होती.
पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. बिहारमधल्या पाटणा भागातील पत्रकारनगरात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून कॉलगर्ल, दलाल आणि खोलीची देखभाल करणारा नोकर यांना ताब्यात घेतले.
रॅकेटचा सूत्रधार शिव कुमार फरार झाला आहे. जी कॉलगर्ल ताब्यात घेण्यात आली आहे ती कोलकात्याची रहिवासी असल्याचं कळालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दलाल त्यांच्या ग्राहकांना व्हॉटसअपवरून कॉलगर्लचे अल्बम पाठवायचे.
ग्राहकाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर दलाल पुढची तयारी करायचे. पश्चिम बंगालपासून सिलीगुडीपर्यंतच्या कॉलगर्ल बोलावण्यात येत होत्या. ज्या घर मालकाने त्याच्या घरातील खोल्या सेक्स रॅकेटसाठी भाड्याने दिल्या होत्या त्याचीही पोलीस चौकशी करत आहेत.