Popular Whiskey Brands In India : भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. देशात करोडो लोक दारूचे शौकीन आहेत. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारूसाठी लोक काहीही करू शकतात. पण दारू पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निवड ही वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकजण स्वतःच्या बजेटनुसार दारूचे सेवन करत असतो. भारतातील अनेक कंपन्या दारूची निर्मिती करत आहेत. तसेच प्रत्येकजण बजेटनुसार व्हिस्की, रम किंवा बिअरचे सेवन करत असतात. भारतात देखील काही ब्रँड व्हिस्की तयार होतात त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
1. Imperial Blue 750 ML
तुम्हीही दारूचे शौकीन असाल तर तुम्हाला माहिती असेल की Imperial Blue ही जगातील तिसरी सर्वात मोठी व्हिस्की म्हणून ओळखली जाते. तसेच भारतामध्ये या व्हिस्कीचा सर्वाधिक वापर केला जातो. भारतीय व्हिस्की पेर्नोड रिकार्ड नावाच्या कंपनीने Imperial Blue व्हिस्की तयार केली आहे जिची किंमत 490 रुपये आहे.
2. रॉयल स्टॅग
रॉयल स्टॅग भारतातील ब्रँड व्हिस्की आहे. 1955 मध्ये व्हिस्की ब्रँड पेर्नोड रिकार्ड इंडियाने ही लाँच केली आहे. दिल्लीमध्ये या व्हिस्कीची किंमत 470 रुपये आहे.
3. रॉयल चॅलेंज
1980 मध्ये रॉयल चॅलेंज व्हिस्की शॉ वॉलेस अँड कंपनीने सादर केली आहे. यावेळीपासून ही व्हिस्की सादर करण्यात आली आहे तेव्हापासून हीची लोकप्रियता वाढत चालली आहे. भारतामध्ये या व्हिस्कीची विक्री देखील सर्वाधिक होत असते. या व्हिस्कीची दिल्लीत किंमत 450 रुपये आहे.
4. McDowell’s No. 1
जगातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की म्हणून मॅकडॉवेलला ओळखले जाते. हे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड निर्मित आहे. त्याची किंमत 440 रुपये आहे.
5. ऑफिसर्स चॉइस ब्लू
हा भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणार्या व्हिस्की ब्रँडपैकी एक आहे. हे अलाईड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्स अंतर्गत भारतातील तिसरे मोठे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आहे. त्याची किंमत 490 रुपये आहे.
6. बॅगपाइपर डिलक्स
बॅगपायपर हा भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्या व्हिस्की ब्रँडपैकी एक आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. हे 1976 मध्ये लाँच केले गेले. त्याची किंमत 390 रुपये आहे.
7. 8 PM
भारतातील मध्यमवर्गीयांसाठी 8 PM ही व्हिस्की सर्वाधिक लोकप्रिय आहे. या व्हिस्कीची किंमत फक्त 490 रुपये आहे. त्यामुळे मध्यवर्गीय लोकांच्या आवडती व्हिस्की आहे.
8. रॉयल ग्रीन क्लासिक
प्रीमियम इंडियन ग्रेन स्पिरीट आणि इंपोर्टेड स्कॉच माल्ट यांच्या मिश्रणापासून तयार केलेली रॉयल ग्रीन क्लासिक व्हिस्की भारतामध्ये अधिक लोकप्रिय आहे. या व्हिस्कीची किंमत 460 रुपये आहे.
9. ऑल सीजन
ऑल सीजन ही व्हिस्की ओएसिस ग्रुपने तयार केलेली आहे. भारतातील अनेक लोकांचा हा लोकप्रिय व्हिस्की ब्रँड आहे. या व्हिस्कीची किंमत 480 रुपये आहे.
10. डेनिस स्पेशल
डेनिस स्पेशल ही व्हिस्की रॉक अँड स्टॉर्म डिस्टिलरीने बनवलेली आहे. दिल्लीमध्ये तयार होणारी ही व्हिस्की भारतीय लोकांना खूप आवडते. या व्हिस्कीची किंमत 370 रुपये आहे.
11. डायरेक्टर स्पेशल ब्लॅक
ही व्हिस्की गव्हापासून बनविली जाते आणि एक कुरकुरीत दारू आहे जी मसालेदार नोट्सपासून जास्त काळ टिकण्यासाठी मदत करते. ही युनायटेड स्पिरिटने बनवलेली व्हिस्की आहे. या व्हिस्कीची किंमत 500 रुपये आहे.