Post Office Franchisee : फक्त 5000 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिससोबत करा ‘हे’ काम अन् दरमहा कमवा बंपर कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Franchisee : तुम्ही देखील तुमच्यासाठी येणाऱ्या काळात नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे.

आम्ही आज तुम्हाला या लेखात एका मस्त बिझनेस प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही दरमहा हजारो रुपयांची कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपयांची कमाई करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्हाला हा नवीन व्यवसाय पोस्ट ऑफिससह सुरु करावा लागणार आहे. हे जाणून घ्या कि यामध्ये जास्त जोखीम नाही आणि नफाही चांगला आहे.

ग्राहकांना सुविधा देण्यासाठी पोस्ट ऑफिससध्या पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी देत आहे. जी कोणीही सहज घेऊ शकते. यामध्ये गुंतवणूकही कमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो पोस्ट ऑफिस फ्रँचायझी व्यवसायात कमाई कमिशनद्वारे होते. तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रदान कराल त्या पोस्ट ऑफिस सेवांसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून कमिशन मिळेल. पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत प्रथम आउटलेट फ्रँचायझी आणि दुसरी फ्रेंचाइजी पोस्टल एजंट. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही फ्रँचायझी योजना निवडू शकता.

कोण अर्ज करू शकतो?

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कोणीही फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने पोस्ट ऑफिसमध्ये काम करू नये आणि तो आठवी पास असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी कमाई

फ्रँचायझी उघडल्यानंतर तुम्ही टपाल तिकीट, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर इत्यादी अनेक प्रकारच्या सेवा देऊन कमाई करू शकता. पोस्टल पोस्ट बुक केल्यावर तुम्हाला 3 रुपये, स्पीड पोस्टवर 5 रुपये, टपाल तिकीट आणि स्टेशनरीच्या विक्रीवर 5 टक्के कमिशन मिळते.

असा करा अर्ज 

यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला राज्य कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf वर जावे लागेल. यानंतर, येथून फॉर्म डाउनलोड करून, तुम्ही फॉर्म भरून फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकता. यानंतर, खालील फॉर्मवरून पोस्ट ऑफिसमधून AMU प्राप्त होईल. यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस सेवा देऊ शकता.

हे पण वाचा :- Astro Tips : चुकूनही घरात ‘या’ देवी-देवतांच्या मूर्ती लावू नका नाहीतर होणार ..