Categories: भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्ट्ला स्थिगिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या नवीन संसद भवनाच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

देशाच्या नव्या संसद भवनाच्या म्हणजेच सेंट्रल विस्ता या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.

मात्र,सर्वोच्च न्यायलयाने नव्या संसद भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आयोजनावरुन नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कुठलंही बांधकाम होणार नाही याची हमी दिली.

संसद भवनाच्या जवळच ही नवीन इमारत होणार आहे. प्रकरण न्यायालयात असताना दिल्लीच्या मध्यभागी अशा प्रकराचं बांधकाम होऊ नये असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

केंद्र सरकार या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करु शकते मात्र बांधकाम करता येणार नाही असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

एकीकडे भूमीपूजनाला परवानगी दिली असली तरी या कार्यक्रमाव्यक्तीरिक्त नवीन संसद भवनासंदर्भात कोणतेही काम केले जाणार नाही असे निर्देश न्यायालयाने दिलेत.

यामध्ये कोणतेही बांधकाम पाडणे किंवा उभारणे, प्रकल्पाच्या जागेवर वृक्षतोड करणे या सर्व गोष्टींना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान,

१० डिसेंबरच्या कार्यक्रम करण्यास काही हरकत नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्ता या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24