Praveen Hinganikar Accident: काही दिवसापूर्वी भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात झाला होता या अपघातामध्ये ऋषभ पंतची कार जाळून खाक झाली होती. तर आता भारताचा माजी क्रिकेटपटू भीषण कार अपघाताचा बळी ठरला आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या विदर्भाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांचा बुधवारी कार अपघात झाला. या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाला असून, कारमध्ये त्याच्यासोबत बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की प्रवीण आपल्या पत्नीसह नागुपरहून परतत होता. त्यानंतर त्यांची कार रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या ट्रकला धडकली. ही टक्कर एवढी धोकादायक होती की, प्रवीणच्या गाडीचा चक्काचूर झाला. यात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रवीणला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर नागरे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “ट्रक महामार्गावर चुकीच्या पद्धतीने उभा होता. ट्रक हलत नसल्याचे प्रवीणच्या लक्षात आले नाही. यामुळे कार ट्रकवर आदळली. आम्ही ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
प्रवीणने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अष्टपैलू म्हणून केली होती. त्याने 1983 ते 1996 दरम्यान विदर्भासाठी 51 प्रथम श्रेणी सामने, 17 लिस्ट ए सामने खेळले. तो संघाचा कर्णधारही होता. यानंतर ते 2008 ते 2018 पर्यंत मुख्य क्युरेटरही होते. प्रवीण हे बीसीसीआयचे प्रमाणित प्रशिक्षक आहेत. विदर्भाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी मुख्य क्युरेटर म्हणून संबंधित होते.
हे पण वाचा :- Shukra Gochar 2023: मिथुन राशीत करणार शुक्र प्रवेश ! ‘या’ 3 राशींचे भाग्य बदलणार ; जाणून घ्या सर्वकाही