भारत

Preet Tractor : महिंद्राला टक्कर देण्यासाठी बाजारात लॉन्च होणार शक्तिशाली ट्रॅक्टर, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Preet Tractor : शेतकऱ्यांसाठी आणखी एक चांगली बातमीचा आहे. कारण आता भारतीय मार्केटमध्ये आणखी एक नवीन शक्तिशाली ट्रॅक्टर लॉन्च होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी एक ट्रॅक्टर खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

सध्या भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. तसेच अनेक अनेक कंपन्या नवीन ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देता आहेत. सध्या बाजारात महिंद्रा कंपनीचे अनेक ट्रॅक्टर सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

मात्र आता महिंद्रा ट्रॅक्टरला टक्कर देण्यासाठी प्रीत ट्रॅक्टर कंपनीचा एक नवीन ट्रॅक्टर बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. प्रीत कंपनीचा हा २०२३ मधील नवीन ट्रॅक्टर 2549 पॉवरसह बाजारात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी एक शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

प्रीत 2549 2wd ट्रॅक्टर शक्तिशाली इंजिन तपशील

प्रीत कंपनीच्या 2549 2wd ट्रॅक्टरमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीकडून 1854 सीसी २ सिलिंडर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 2000 rpm जनरेट टॉर्क जनरेट करते. यामध्ये वॉटर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. त्यामुळे इंजिन सतत थंड राहते.

प्रीत 2549 2wd ट्रॅक्टर गिअरबॉक्स आणि पॉवर स्टीयरिंग तपशील

प्रीत 2549 2wd ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीयरिंग देण्यात आले आहे. तसेच ट्रॅक्टरमध्ये 10 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्स आहेत.

प्रीत 2549 2wd ट्रॅक्टर वैशिष्ट्ये

कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये अनेक खास वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. यामध्ये अॅडजस्टेबल ऑपरेटर सीट, पॉवरफुल हेडलॅम्प, सुंदर डिझाइन, 21.03 HP PTO पॉवर यांचा समावेश आहे.

या ट्रॅक्टरचे ब्रेक ड्राय / ऑइल इमरस्ड पर्यायामध्ये येतात. हे ब्रेक ट्रॅक्टर घसरणे आणि अपघात टाळतात. प्रीत 2549 ट्रॅक्टरमध्ये पुढील टायर 5.2 X 14 / 6 x 12 आहे आणि मागील टायरचा आकार 8.3 x 20 इंच देण्यात आला आहे.

प्रीत 2549 2wd ट्रॅक्टर किंमत

सध्या अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने शेतकऱ्यांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. प्रीत 2549 2wd ट्रॅक्टरची किंमत 4.80 लाख ते 5.30 लाख रुपये आहे. त्यामुळे कमी बजेटमधील शेतकरी देखील हा ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts