पंतप्रधान मोदी यांची वाढती लोकप्रियता काँग्रेसला देखवत नसल्यानेच ‘तो’प्रकार घडला!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- पंतप्रधान सारख्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत त्रुटी ठेवणे ही पंजाब काँग्रेस सरकार मुद्दाम केलेली चुकच म्हणावी लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता ही काँग्रेसला देखवत नाही.

त्यामुळे अशा अनुसूचित घटना घडवुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव काँग्रेसने साधला आहे. परंतु अशा घटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उंचच होणार आहे. अ

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शी टीका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी केली. वसंत राठोड म्हणाले, पंजाब सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षेत जो कसूर करुन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढते प्राबल्य काँग्रेसला देखवत नसल्याने अशा पोरकट कृती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष लोकापर्यंत पोहचू नये असेच वाटत असल्याने अशी कृती होत आहे.

यावेळी ऍड.विवेक नाईक म्हणाले, देशाची अतिमहत्वाची व्यक्ती म्हणजे पंतप्रधान. जर त्यांच्याबाबत असे काही घडत असले तर भाजपा काँग्रेस सरकारला धडा शिकवेल, असा इशारा दिला.