Categories: भारत

अभिमानास्पद! उद्योजक रतन टाटा यांना मिळणार प्रतिष्ठेचा पुरस्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)ने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ॲण्ड पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या संघटनेचे अध्यक्ष गुल कृपलानी यांनी सांगितले की, इस्त्रायलबाबत रतन टाटा यांनी कायम भक्कम पाठिंबा दिला आहे. भारताचा सन्मान कायम राखत त्याला वैश्विक पातळीवर पुढे नेण्याबाबत त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.

एकता,शांतता आणि स्थैयर् यांचे प्रतीक असलेल्या टाटा यांचा भारत, इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती येथील उद्योग जगतामध्ये आदर केला जातो. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच देशाच्या औद्योगिक जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्ल्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील सन्मान करण्यात आला होता. टाटा यांना ‘assocham enterprise of the century award’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24