भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला जाणार आहे. भारताचा नागरिक WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्याकडे ही सूत्रे होती. हर्षवर्धन यांची या जागी जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या 34 सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत.
अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, मंगळवारी 194 देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त कऱण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या.
क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्णकाळासाठी नसून त्यांना कार्यकारी बोर्डच्या बैठकींमध्ये अध्यक्षता करण्याची आवश्यकता असेल. बोर्डा वर्षातून किमान दोन बैठका घेते.
मुख्य बैठक जानेवारीमध्ये होते. आरोग्य सभेनंतर मे महिन्यात आणखी एक लहान बैठक होते. कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षांचे मुख्य काम आरोग्य सभेचे निर्णय आणि निती तयार करण्यासाठी सल्ला देणं हे असतं.