Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Psychological Tips For Office : ऑफिसमध्ये बॉसला खुश करायचंय तर फॉलो करा या 6 मानसशास्त्रीय टिप्स, होईल फायदा

Psychological Tips For Office : तुम्हीही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला तुमच्या बॉसला खुश करायचे आहे? तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईलच पण ऑफिसमध्ये देखील तुमचा परफॉर्मन्स चांगला पडेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीमध्ये बॉससमोर एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे असते. त्यामुळे सतत ते बॉससमोर कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रकाशझोतात राहत असतात. तुम्हालाही तुमच्या बॉसला खुश करायचे असेल तर खालील ६ टिप्स फॉलो करा.

1. आत्मविश्वासने उभे राहा

तुम्ही जेव्हाही तुमच्या बॉससमोर किंवा ऑफिसमध्ये सर्वांसमोर बोल्ट असता तेव्हा आत्मविश्वासने उभे राहा. तसेच तुमच्या बोलण्याची शैली देखील इतरांपेक्षा जरा वेगळी ठेवा. एका संशोधनानुसार डोळ्यात डोळे घालून बोलणे हे एक आत्मविश्वासाचे लक्षण आहे. तसेच हँडशेक करताना तो कधीही सैल नसावा. हँडशेक हा घट्ट हात पकडून करावा.

2. कमी वेळेत तुमचे बोलणे उरकण्याचा प्रयत्न करा

जर तुम्हाला ऑफिसमध्ये एखाद्या कार्यक्रमानिमित्त किंवा मिटिंगनिमित्त बोलण्याची संधी मिळाली तर तुम्ही कमी वेळेत तुमचे महत्वाचे पॉईंट मांडण्याचे प्रयत्न करा. जास्त वेळेत कमी महत्वाचे मुद्दे मांडणे हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तुमचे पॉईंट इतरांना पटतील असे स्पष्टीकरण द्या.

3. नियम तोडणे

तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेईचे असेल तर तुम्ही कोणाचीही वाट न पाहता स्वतःची कॉफी स्वतःच्या हाताने बनवा. त्यामुळे सर्वजण तुमच्याकडे पाहतील. ऑफिसमधील ठरलेल्या नियमांपेक्षा तुम्ही थोडे काही वेगळे केले तर लोक नक्कीच तुमच्याकडे लक्ष देतील.

4. हसणे महत्वाचे आहे

तुम्ही ऑफिसमध्ये बोलत असताना तुमचा चेहरा नेहमी हसरा ठेवा. तसेच ऑफिसमध्ये वातावरण चांगले ठेवण्यासाठी मोकळ्या वेळेत सतत इतरांसोबत गप्पा मारा. त्यामुळे तुमचे काम देखील जलद गतीने होईल आणि वातावरण देखील ताजेतवाने राहील.

5. प्रेझेंटेशन देताना काळजी घ्या

जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत असाल तर तुम्हाला तुमची देहबोलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमची देहबोली व्यवस्थित असेल तर तुम्ही नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकाल. तसेच प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण द्या.

6. एका वेळी एकच गोष्ट करा

काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके अधिक उत्पादनक्षम व्हाल. मल्टीटास्किंगमुळे एकाच वेळी बरीच कामे होतात, परंतु संशोधनात असे आढळून आले आहे की मल्टीटास्किंग करताना आपली उत्पादकता कमी होते. काही संशोधनात असे म्हटले आहे की मल्टीटास्किंगमुळे उत्पादकता 40% कमी होते.