Categories: भारत

वोडाफोन-आयडियासाठी धक्का ; 15 जानेवारीपासून ‘ह्या’ शहरात बंद होणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया दिल्लीत 15 जानेवारीपासून आपली 3G सेवा बंद करणार आहे.

या बदलामुळे कंपनीने दिल्ली सर्कलमधील आपल्या ग्राहकांना आपलं सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करण्यास सांगितलं आहे. कंपनीने उचललेलं हे पाऊल म्हणजे स्पेक्ट्रम रि-फार्मिंगचा एक भाग आहे,

ज्याअंतर्गत ऑपरेटर 4G सेवांसाठी आपल्या 3G स्पेक्ट्रमचा वापर करत आहे. त्यामुळे दिल्लीचे Vi ग्राहक आपल्या जवळच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन आफलं सिम कार्ड 4जीमध्ये पोर्ट करु शकतात.

यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारलं जाणार नाही. Vi चे सध्याच्या 2जी युजर्सची व्हॉइस कॉलिंग सेवा सुरूच राहणार आहे. मात्र, ते जुन्या सिमवर इंटरनेटचा वापर करु शकणार नाहीत.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानुसार , दिल्ली सर्कलमध्ये Vi चे एक कोटी 62 लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यातील 3जी युजर्सना आता 15 जानेवारीपर्यंत आपलं सिम 4जीमध्ये पोर्ट करावं लागेल.

अहमदनगर लाईव्ह 24