Categories: भारत

सरकारने रिझर्व्ह बँकेवर मारला डल्ला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुमारे १.७६ लाख कोटींचा संचित निधी व लाभांश घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘आरबीआयवर डल्ला मारल्याने आता काहीच होणार नाही. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा लाभांश व संचित निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्यावरून माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा केंद्राशी वाद झाला होता. तथा ऊर्जित पटेल यांनीही आपल्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही आरबीआयने हा निधी सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. 

आपल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर कसे पडावे हेच पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना ठाऊक नाही. आता रिझर्व्ह बँकेत चोरी केल्याने काहीच होणार नाही. हा एखाद्या दवाखान्यातून बँड-एड चोरून गोळी लागून झालेल्या जखमेवर लावण्यासारखा प्रकार आहे’, असे राहुल यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24