Railway Ticket Booking:- जेव्हाही आपल्याला रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा आपण बऱ्याचदा तिकीट रिझर्वेशन करतो. परंतु एक ते दोन महिने आधी रिझर्वेशन करून देखील तिकीट कन्फर्म होत नाही. त्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. तसेच सध्याचा कालावधी पाहिला तर यामध्ये आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत असल्याने रेल्वेला प्रचंड प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे व याकरिता रेल्वेच्या माध्यमातून काही स्पेशल ट्रेन देखील अनेक मार्गांवर सुरू करण्यात आलेले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर लांबचा प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी दोन ते तीन महिने आधी रेल्वेचे तिकीट बुक करतात. परंतु बऱ्याचदा प्रवास करण्याचा दिवस येऊन जातो तरी देखील तिकीट कन्फर्म झालेले नसते व ऐन वेळेला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा अनुभव आला असेल की आपण एक ते दोन महिने आधी तिकीट बुक करून देखील तिकीट कन्फर्म होत नाही.
परंतु तुम्ही जर तिकीट एजंटा कडे गेला तर लागलीच तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळते. कितीही मोठी वेटिंग लिस्ट तिकिटांसाठी असली तरी देखील मिनिटांमध्ये तुम्हाला असे एजंट तिकीट कन्फर्म करून देतात. साहजिकच याकरिता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतात. परंतु तुम्ही यामध्ये कधी विचार केला आहे की, तिकिट एजंट इतक्या पटकन कशा पद्धतीने तिकीट कन्फर्म करून देतात? यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
तिकीट एजंटांकडून कन्फर्म तिकीट घ्या परंतु जरा सांभाळून
तुम्ही दोन ते तीन महिन्या आधी तिकीट बुक करून देखील तिकीट कन्फर्म होत नाही. परंतु तिकीट एजंट मात्र काही मिनिटात तुम्हाला कितीही वेटिंग लिस्ट राहिली तरी देखील तिकीट कन्फर्म करून देतात. कारण असे तिकीट हे इतर कोणत्याही नावाने त्यांनी बुक केलेले असतात.
अशा तिकिटावर तुमचं नाव शंभर टक्के नसतेच. असे तिकीट आपल्याला दिले जाते. असे तिकीट देताना हे एजंट सांगतात की, जरी टीटीईने प्रवास करताना तुमच्याकडे तिकिटाविषयी विचारणा केली तरी तुमच्याकडे तो आयडी मागत नाही. हे तिकीट एजंट तिकीट काउंटर वरून वेगवेगळ्या नावाने तिकीट बुक करतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी कन्फर्म केलेले तिकीट त्याला मागितलं तर तो दुप्पट पैसे घेतो व तुम्हाला कन्फर्म तिकीट देतो. तिकीट देताना तुम्हाला सांगितले जाते की गाडीत टीटीईने तपासणी केली तरी तो तुमचा आयडी मागत नाही.
फक्त तुमचं नाव कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला विचारेल. कारण यामध्ये तिकीट काउंटर वर जेव्हा तिकीट घेतले जाते तेव्हा आयडी विचारला जात नाही. त्यामुळे तुम्ही जर तिकीट एजंटांकडून तिकीट घेतले तर तुम्हाला त्या तिकिटावर असलेले बदललेले नाव सांगण्यास सांगितले जाते. परंतु जर वेळ चांगली असेल व टीटीईने फक्त लिस्टमध्ये तुमचं नाव पाहून जाऊ दिले तर ठीक. पण तसं न करता जर रेल्वेत टीटीईला थोडीशी शंका आली व त्याने तुमच्याकडे आयडी प्रूफ मागितला तर मात्र तुम्ही या प्रकरणात अडकू शकता व तुम्हाला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो.
जेव्हा अशा प्रकारे जर आपण सापडलो तर प्रथम आपली सीट जाते. म्हणजेच तिकीट एजंटाला त्या सीट साठी दोन ते तीन पट पैसा जास्त पैसे देऊन देखील काही उपयोग होत नाही आणि वरून बनावट तिकीटमुळे दंड देखील भरावा लागतो. वरून अजून दुसरे तिकीट काढावे लागेल. म्हणजे एकाच प्रकरणांमध्ये तुमचं सिट ही जाते व दंड ही भरावा लागतो व नवीन तिकिटासाठी परत नवीन पैसे भरावे लागतात. तुम्हाला माहित असेल की तिकीट एजंटांकडून कन्फर्म तिकीट घेण्याकरिता चारशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो व कालांतराने या पद्धतीने मनस्ताप देखील होऊ शकतो. त्यामुळे तिकीट काउंटरवरूनच तिकीट बुक करण्याची गरज आहे. म्हणजेच यापुढे या अशा समस्या उद्भवल्या तरी तुम्हाला त्याच्याशी तोंड द्यावे लागणार नाही व प्रवास देखील सुखकर होईल.