भारत

Ram temple : राम मंदिराच्या निधीत तिपटीने वाढ, पैसे मोजण्यासाठी लागतात ‘इतके’ दिवस…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ram temple : सध्या राम मंदिराचे काम जोरदार सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील दिला जात आहे. अनेक भक्त देखील पैसे देत आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिर उभारण्यासाठी देशभरातील राम भक्त पुढे सरसावले आहे.

राम भक्त खुल्या मनाने रोख रक्कम दान करत आहेत. ट्रस्ट कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, दानपेटीतून निघणाऱ्या रकमेची होणारी मोजणी आणि जमा करण्यासाठी नियुक्त केलेल्या बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टला ही माहिती दिली. रोख रकमेत तिपटीने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बँकेने राम मंदिरातील दानपेटीतीली पैसे मोजण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही दान रकमेत गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे सांगितले आहे. तसेच दानपेटीतून निघाणारी रोख रक्कम मोजण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागतो.

15 दिवसातच दान रक्कम एक कोटींच्या घरात गेली. राम मंदिराची दानपेटी दर दहा दिवसांनी खोलली जाते. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून मौल्यवान आणि उच्च प्रतीचे सागाचे लाकूड अयोध्येत पाठवले जाणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी खुलं होईल.

सध्या राम मंदिर निर्मितीचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी यंदाच्या रामनवमीला भव्य आयोजन करण्यात आले आहे. यामुळे हे मंदिर कसे असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रभू रामांची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शालिग्राम शिला आणण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office