अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं होतं.शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
अशातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही दानवेंवर घणाघाती टीका केली आहे. रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत,
त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, असे रघुनाथदादा पाटील यांनी म्हटले आहे. इंदापूर तालुक्यात भिगवण येथे ते बोलत होते. पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्ये करतात.
मात्र अशा प्रकारचं वक्तव्य करणं पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे याचा विचार ते कधीच करत नसल्याचं पाटील म्हणाले.