अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात चीन अन् पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात टाकळी कोलते येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून शेतकऱ्यांनी आपला माल आता बाजार समितीमध्येच विक्री केला पाहिजे असे नाही.
शेतकरी आपला माल आपल्या मर्जीप्रमाणे कोठेही विक्री करू शकतो. ही या कायद्यात तरतूद असून या कायद्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतात व्यापारी जातील व शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे भाव देतील असा हा केंद्रीय कृषी कायदा आहे, असे दानवे म्हणाले. परंतु विरोधक केंद्रीय कृषी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आराेप त्यांनी या वेळी केला.