Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! सरकारकडून नवीन नियम लागू, लाभार्थ्यांना होणार फायदा…

सरकारच्या नवीन नियम प्रणालीमुळे सरकार तसेच रेशन लाभार्थ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम रेशनकार्ड धारकांना माहिती असणे आवश्यक आहे.

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. आता सरकारकडून रेशन वाटपासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता रेशन वाटपामध्ये अनेक बदल झाले आहेत. या नवीन नियमांचा रेशनकार्डधारकांना फायदा होणार आहे. त्यामुळे नवीन नियम माहिती असणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे अनिवार्य केली आहेत. त्यामुळे आता रेशनमध्ये होणाऱ्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. त्यामुळे सरकार आणि रेशनकार्ड धारकांना दोघांनाही फायदा होणार आहे.

सरकारने हा नियम सर्वत्र लागू

रेशन वाटपातील काळाबाजार रोखण्यासाठी दिवसेंदिवस सरकारकडून अनेक नवीन नियम लागू करण्यात येत आहेत. आता सरकारकडून सर्व रेशन दुकाने ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) उपकरणांशी जोडली गेली आहेत.

या ऑनलाईन प्रणालीमुळे रेशन वाटपामधील काळाबाजार होण्यास प्रतिबंध लागेल असा सरकारचा विश्वास आहे. कोणत्याही रेशनकार्ड धारकांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या रेशनपेक्षा कमी रेशन मिळू नये त्यामुळे सर्व रेशन दुकानदारांना हायब्रीड मॉडेल पॉइंट ऑफ सेल मशीन देण्यात आली आहे.

या मशीनमुळे रेशन वाटप करत असताना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने माहिती सबमिट करावी लागत आहे. त्यामुळे आता रेशनकार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याही रेशन दुकानात त्यांचे रेशन मिळू शकेल.

हा नवीन नियम आहे

रेशन वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून नवीन नियम लागू केले जात आहेत. अनेक रेशनकार्ड धारकांच्या कमी रेशन मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सरकारकडून ऑनलाईन प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे उपकरण उपयुक्त ठरेल

हायब्रीड मॉडेल पॉइंट ऑफ सेल मशीनमुळे रेशन धारक आणि सरकारला देखील फायदा होणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे सर्व रेशन मिळेल आणि काळाबाजार देखील होणार नाही याची खात्री सरकारकडून करण्यात येत आहे.

कोरोना काळापासून मोफत रेशन

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना फायदा होत आहे. तसेच ही मोफत रेशन योजना केंद्र सरकारकडून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.