राम मंदिर उद्घाटनाला आरबीआय 500 ची नवीन नोट जारी करणार, 500 रुपयांच्या नोटांवर आता प्रभू श्रीरामांचा फोटो ? RBI काय म्हणतंय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lord Rama Photo On 500 Note : पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार होत आहे. सुप्रीम कोर्टाने विवादीत जमिनीवर प्रभू श्रीरामांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाची तयारी सुरू झाली.

आता प्रभू श्रीरामजीच्या या ऐतिहासिक आणि भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिराचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही मात्र मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ही प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. म्हणजे येत्या दोन दिवसात या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तसेच याच दिवशी मंदिर राष्ट्रासाठी समर्पित केले जाणार आहे.

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे मंदिर जगातील तमाम राम भक्तांसाठी खुले होणार आहे. यामुळे सध्या राम भक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन पाहायला मिळत आहेत. मंदिराशी संबंधित अनेक छायाचित्रे, त्यांच्यासह प्रभू रामजीच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील भव्य राम मंदिराचा एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियामध्ये राम मंदिराचे आणि प्रभू श्रीरामजीच्या मूर्तीचे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. अशातच मात्र सोशल मीडियामध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचशे रुपयांची एक नवीन नोट जारी केली असल्याचे वृत्त वेगाने व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे या व्हायरल मेसेजमध्ये पाचशे रुपयांच्या एका नवीन नोटचा फोटो देखील दाखवला जात आहे. या व्हायरल नोटवर राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी प्रभू श्री रामाचा फोटो असून राम मंदिराच्या अभिषेकवेळी रिझर्व्ह बँकेने विशेष नोट मंजूर केल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांच्या माध्यमातून खरंच आरबीआयने असा निर्णय घेतला आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आज आपण यामागील सत्यता पडताळून पाहणार आहोत.

काय आहे सत्यता :- रघुन मूर्ती नावाच्या एका वापरकर्त्याने एक्स हॅन्डलवर 14 जानेवारी 2024 रोजी एक पाचशे रुपयांची नोटचा फोटो शेअर केला. हा फोटो पूर्णपणे एडिटेड होता. या नोट वर प्रभू श्रीरामांचे चित्र होते. तसेच यावर प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे देखील चित्र होते. या युजरने प्रभू श्रीरामांच्या भव्य राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हा फोटो एडिट करून आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला होता.

यातून त्याने आपले रचनात्मक कार्य सोशल मीडियावर सादर केले होते. पण हा फोटो सोशल मीडियावर वायू वेगाने व्हायरल झाला आणि याबाबत खोटा दावा इंटरनेटवर पसरला. 500 रुपयांच्या नोटचे बनावट छायाचित्र व्हायरल होऊ लागल्यावर युजरने स्वत: आणखी एक पोस्ट करून लोकांना आवाहन केले की खोटी माहिती पसरवू नका. वापरकर्त्याने त्याच्या X हँडलवर लिहिले की, “कोणीतरी माझ्या क्रिएटिव्ह कामाचा दुरुपयोग करून ट्विटरवर चुकीची माहिती पसरवली आहे.”

मला हे स्पष्ट करायचे आहे की त्यांनी माझ्या कामाचे श्रेय दिलेल्या चुकीच्या माहितीचे मी समर्थन करत नाही किंवा ते माझ्या मालकीचे नाही. यावरून हे स्पष्ट होत आहे की आरबीआय प्रभू श्रीरामजीच्या मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामजीचे छायाचित्र असलेली पाचशे रुपयांची नोट जारी करणार नसून ही फक्त आणि फक्त अफ़वा आहे. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आता जाणकार लोकांनी केले आहे.