भारत

DA Hike Update: देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी बातमी! लवकरच होईल महागाई भत्ता वाढीची घोषणा?

Published by
Ajay Patil

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहिले तर महागाई भत्ता वाढ, घर भाडेभत्ता तसेच सातवा वेतन आयोगाच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. याबाबत जर आपण महागाई भत्ताचा विचार केला तर मागच्या वर्षी करण्यात आलेल्या चार टक्के वाढीसह कर्मचाऱ्यांना आता 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे.

परंतु यामध्ये लवकरात लवकर आणखीन वाढ केली जाईल अशी शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा केली जाते.

यासंबंधी वाढीची घोषणा साधारणपणे मार्च महिन्यामध्ये केली जाते व अंमलबजावणी जानेवारीपासून करण्यात येते. या अनुषंगाने जर पाहिले तर यावेळी महागाई भत्त्यात किती वाढ होऊ शकते? हा देखील प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. याबाबतचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते?

 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता दिला जातो तो सीपीआय- आयडब्ल्यूच्या आधारे गणला जातो. यामध्ये कामगार मंत्रालयाची शाखा आणि कामगार ब्युरो प्रत्येक महिन्याला सीपीआय- आयडब्ल्यू डेटा जारी करत असते.

याशिवाय केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे ते सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे जे कर्मचाऱ्यांना वेतन मिळते व पेन्शनधारकांना पेन्शन मिळते त्यांना ते लागू होते.

 जर महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर पगारात किती होईल वाढ?

 देशातील जे काही सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांना महागाई सवलत आणि भत्ता मिळत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा महागाई भत्ता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारा पगाराचा एक भाग असतो

व त्यामुळे महागाई भत्त्यात झालेली वाढ कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी असते. कारण महागाई भत्यात जर वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना हातात मिळणाऱ्या पगारात देखील वाढ होते. जर आपण उदाहरण समजून घेतले तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला 53 हजार पाचशे रुपये मूळ वेतन मिळते

व 46% या दराने महागाई भत्ता 24 हजार 610 रुपये होता. जर आता परत त्यामध्ये वाढ होऊन जातो 50% पर्यंत झाला तर महागाई भत्ता हा 26 हजार 750 रुपये होईल.

म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामध्ये 2140 रुपयांनी वाढ होईल. म्हणजेच चार टक्के वाढ झाली तर पगारामध्ये 2140 ने वाढ होईल. जर वार्षिक आधारावर ही गणना केली तर पगारामध्ये 25 हजार 680 रुपयांनी वाढ होईल.

 कधी होईल महागाई भत्त्यात वाढ?

 केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होऊ शकते. जर आपण मागच्या वर्षी पाहिली तर साधारणपणे 24 मार्च 2023 रोजी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती व ती एक जानेवारी 2023 पासून लागू करण्याचा विचार झाला होता. यावर्षी देखील याच पद्धतीने वाढ होईल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.

Ajay Patil