भारत

Steel and Cement Today Price : होळीच्या मुहूर्तावर घर बांधणाऱ्यांना दिलासा! स्टील आणि सिमेंटच्या किंमतीत मोठा बदल, पहा नवीन दर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Steel and Cement Today Price : होळीच्या मुहूर्तावर घर बांधण्याची सुरुवात करायची असेल तर एक चांगली संधी आहे. कारण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात घर बांधणे शक्य झाले आहे.

ज्या लोकांना स्वप्नातील घर बांधायचे आहे आणि बजेट कमी आहे अशा लोकांसाठी चांगली संधी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या किमती फारच कमी झाल्या आहेत. त्यामळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमचे पैसे वाचू शकतात.

काही महिन्यापूर्वी स्टील आणि सिमेंटच्या किमती खूपच वाढल्या होत्या. तसेच वाळू, विटा आणि बांधकामासाठी लागणारे इतर साहित्य देखील महाग झाले होते. पण आता त्या सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या ७० हजार रुपये प्रति टन स्टील झाले होते. तसेच सिमेंटच्या किमती ४०० रुपये प्रति बॅगच्या पुढे गेले होते. मात्र आता जवळपास स्टीलच्या किमती १५ हजार रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे स्टील खरेदी करताना पैशांची मोठी बचत होऊ शकते.

स्टीलचे नवीन आजचे दर

गेल्या वर्षी स्टील खूप महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे शक्य नव्हते. मात्र आता सर्वसामान्य नागरिक कमी बजेटमध्ये देखील स्वतःचे घर बांधू शकतात.

मुंबई       महाराष्ट्र      TMT 12mm      56000 रुपये प्रति टन    5-मार्च-23
नागपूर    महाराष्ट्र      TMT 12mm      51500 रुपये प्रति टन    5-मार्च-23
जालना    महाराष्ट्र      TMT 12 mm     55500 रुपये प्रति टन    5-मार्च-23

सिमेंटच्या आजच्या किमती

एसीसी सिमेंट- 375 रुपये प्रति बॅग
अल्ट्राटेक सिमेंट- 330 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट- 375 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट- 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट- 410 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट- 390 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट- 330 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट- 350 रुपये प्रति बॅग

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उतार कायम

स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये सतत चढ उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर खूपच वाढले होते. त्यामुळे घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडले होते. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे.

स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ झाली की त्यांचे दर देखील वाढत असतात. पण सध्या बांधकाम क्षेत्रातील कामाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दरही कमी झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office