Categories: भारत

वाहनधारकांना दिलासा ; FASTAG लावण्याची मुदत दीड महिन्यांनी वाढवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग अनिवार्य केल्यानंतर आता फास्‍टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी ही मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत होती. वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे केंद्र सरकारने फास्टॅगची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 जानेवारी 2021 पासून राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत करण्याची घोषणा केली होती.

जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा द्यावा लागणार आहे. मात्र, आता फास्टॅग लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.

टोलनाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये FASTAG योजना आणली आहे. मात्र, FASTAG ची संख्या आणि देशात असलेल्या वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना FASTAG लावणे शक्य नव्हतं.

त्यामुळे वाहनधारकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. नवीन वर्षापासून मात्र प्रत्येक वाहनाला FASTAG असणं बंधनकारक केलं होतं. मात्र, आता पुन्हा FASTAG लावण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24