भारत

Mahashivratri : महाशिवरात्रीदिवशी भगवान शंकराची पूजा करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल सर्वनाश

Published by
Ahmednagarlive24 Office

Mahashivratri : हिंदू धर्मात भगवान शिव यांची करोडो लोक पूजा करतात. तसेच दर सोमवारी उपवास करत अनेकजण महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशात महाशिवरात्र धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

१८ फेब्रुवारी २०२३ ला महाशिवरात्री साजरी होणार आहे. भगवान शिव हे सर्वात सौम्य आणि परोपकारी देवता मानले जातात. महादेवाची अनेकजण पूजा करत असतात मात्र काही जण पूजा करत असताना अनेक चुका करतात यामुळे भगवान शिव नाराज होतात. पूजा करताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

भगवान महादेवाची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सिंदूर

भगवान महादेवाची पूजा करताना सिंदूर किंवा रोळीचा वापर कधीही करू नये. महादेव या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहतात.

शंखाने जलाभिषेक करावा

तुम्ही अनेकदा मोठा शंख पाहिला असेल. याच शंखाने महादेवाचा जलाभिषेक करावा. परंतु महादेवाचा जलाभिषेक करण्यासाठी शिंगाच्या आकाराचे शंख वापरले जातात.

पांढरे चंदन

महादेवाची पूजा करत असताना नेहमी पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा हे जाते. महादेवाची पूजा करत असताना चुकूनही पिवळे किंवा लाल चंदन वापरू नका.

तुळशीपत्र

महादेवाची पूजा करत असताना कधीही तुळशीच्या पानांचा वापर करू नये. जर तुम्ही असे केले तर ते अशुभ मानले जाते. हनुमानजी आणि भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांशिवाय इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर कधीही केला जात नाही.

Ahmednagarlive24 Office